Welcome to Info Solapur   Click to listen highlighted text! Welcome to Info Solapur
जिल्हा परिषदप्रशासनमहाराष्ट्र​सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय; ग्रामीण तरुणींना मिळणार मोफत प्रशिक्षण!

ब्युटी पार्लर आणि पोलीस भरती प्रशिक्षणाद्वारे तरुणी होणार स्वावलंबी

ग्रामीण भागातील तरुणींना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना शासकीय सेवेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत मोफत ब्युटी पार्लर आणि पोलीस भरती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे.

​समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी ही माहिती दिली. मंगळवारी झालेल्या समाजकल्याण समितीच्या सभेत या विविध योजनांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामीण तरुणींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पात्र तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा.

Info Solapur

हे सोलापूर जिल्ह्यातील एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज व माहिती पोर्टल आहे. जनता आणि प्रशासन यांच्यामधील संवादाचा प्रभावी दुवा म्हणून कार्य करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. शासनाचे निर्णय, प्रशासनाच्या विविध घडामोडी, शासकीय योजना, जनहिताच्या सूचना, विकासकामे, शिक्षण, कृषी, आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अचूक व तत्परतेने पोहोचविण्याचे कार्य आम्ही करतो. निष्पक्ष, वस्तुनिष्ठ आणि जनहिताला प्राधान्य देणारी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इन्फोसोलापूर कटिबद्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!