Welcome to Info Solapur   Click to listen highlighted text! Welcome to Info Solapur
देश

मोठी बातमी! NEET पेपरफुटीत सीबीआयच्या कारवाया गतीमान; महिलेनंतर पुण्यातून एका विद्यार्थ्याला अटक

नीट पेपर फुटीनंतर एनटीएने यंदाची 3 मे रोजी घेण्यात आलेली NEET 2026 ची परीक्षा रद्द केली असून विद्यार्थ्यांना नव्याने परीक्षा द्यावी लागणार आहे.

पुणे : देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी (NEET) प्रकरणात सीबीआयने (CBI) गतीमान कारवायांना सुरुवात केली असून याप्रकरणात आणखी एका संशयित तरुणाला पुण्यातील फुरसुंगी येथून ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे सीबीआयने आजच पुण्यातील बिबडेवाडी येथून एका महिलेला अटक केली होती. त्या महिलेला आज सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार होते. त्यातच, आता आणखी एकास पुण्यातून (Pune) अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे नाशिकमधील शुभम खैरनारच्या घरी जाऊन पोलिसांची झाडाझडती सुरू आहे. नीट प्रकरणातील चौकसाठी सीबीआयने आरोपी शुभम खैरनारच्या भावालाही ताब्यात घेतलं आहे.

नीट पेपर फुटीनंतर एनटीएने यंदाची 3 मे रोजी घेण्यात आलेली NEET 2026 ची परीक्षा रद्द केली असून विद्यार्थ्यांना नव्याने परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासंदर्भातील तारीख लवकरच जाहीर होईल. मात्र, एनटीएने परीक्षा रद्द करताच, सीबीआयने कारवाईला जोर दिला आहे. याप्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातच सापडले असून नाशिकमधून दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर, आज पुण्यातून एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. नीटचं नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी आज पहाटे मनीषा वाघमारे या महिलेचा ताबा घेतला. संबंधित महिला ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 46 वर्षीय मनिषा ही पुण्यातील (Pune) बिबडेवाडी परिसरात राहत असून तिनेच विद्यार्थ्यांना आरोपीपर्यंत पोहोचविण्याचं काम केल्याचा संशय आहे. आता, इंजिनिअरींगच्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

विद्यार्थ्यास सीबीआयच्या ताब्यात देणार

पुणे पोलिसांनी याप्रकरणात आणखी एका संशयित तरुणाला अटक केली आहे, पुण्यातील फुरसुंगी येथून युवकास ताब्यात घेण्यात आले. सबंधित विद्यार्थी हा इंजिनियरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत असल्याची माहिती आहे. सध्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे, अद्याप त्याच्याकडून कुठलीही माहिती मिळालेली नाही. मात्र, चौकशीसाठी त्याला सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

शुभम खैरनारच्या कुटुंबीयांची चौकशी

नीट परीक्षा गैरप्रकाराबाबत CBI ऍक्शन मोडवर असून नाशिकमधील आरोपी शुभम खैरनारच्या घरी जाऊन झाडाझडती घेण्यात आली. नांदगाव येथील घरी CBI आणि नाशिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात आला असून अधिकाऱ्यांकडून कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. या पथकात एका महिला अधिकाऱ्यांसह सात ते आठ सदस्यांचा समावेश होता. संशयित आरोपी शुभम खैरनार यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही 1 तासाहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. शुभमचा भाऊ भावेश खैरनार याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून घरांची झाडाझडती आणि चौकशीनंतर त्याला सोडणार आहेत.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!