Welcome to Info Solapur   Click to listen highlighted text! Welcome to Info Solapur
जिल्हा परिषदप्रशासनमहाराष्ट्र​सोलापूर जिल्हा

सोलापूर झेडपी बांधकाम विभागात फेरबदल; आसिफ खैरदी यांनी स्वीकारला कार्यकारी अभियंत्याचा पदभार..

खैरदी यांनी स्वीकारला कार्यकारी अभियंत्याचा चार्ज

​राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील ३६ कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या केल्या असून, सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांची नांदेड जिल्हा परिषदेत बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर लातूर येथील महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता आसिफ परवेझ खैरदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खैरदी यांनी बुधवारी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची भेट घेऊन तात्काळ आपला पदभार स्वीकारला. पदभार घेतल्यानंतर त्यांनी अध्यक्ष दीपक वैद्य यांची भेट घेतली, ज्यावेळी अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा शाल घालून सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे खैरदी हे मूळचे सोलापूरचेच रहिवासी असून, यापूर्वी त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यात उप अभियंता म्हणूनही काम पाहिले आहे.

​प्रशासन आणि जनतेमधील विश्वसनीय दुवा

#infosolapur #zpsolapur #zppwd #president

Info Solapur

हे सोलापूर जिल्ह्यातील एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज व माहिती पोर्टल आहे. जनता आणि प्रशासन यांच्यामधील संवादाचा प्रभावी दुवा म्हणून कार्य करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. शासनाचे निर्णय, प्रशासनाच्या विविध घडामोडी, शासकीय योजना, जनहिताच्या सूचना, विकासकामे, शिक्षण, कृषी, आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अचूक व तत्परतेने पोहोचविण्याचे कार्य आम्ही करतो. निष्पक्ष, वस्तुनिष्ठ आणि जनहिताला प्राधान्य देणारी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इन्फोसोलापूर कटिबद्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!