निवडणुकीत दिलेल्या शब्दाचे पालकमंत्री ना. जयकुमारजी गोरे (जया भाऊ) यांच्याकडून तंतोतंत पालन!
कुरुल जिल्हा परिषद गटात विकासाचा धडाका; तब्बल १ कोटी रुपयांच्या दोन प्रमुख रस्ते कामांना प्रशासकीय मंजुरी!
जिल्हा परिषद सदस्य सचिनदादा जाधव व पं. स. सदस्य कोमलताई अंकुश आवताडे यांच्या विशेष पाठपुराव्याला मोठे यश.
ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे बळकट करण्यासाठी आणि दळणवळणाची सोय अधिक सुकर करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटात तब्बल १ कोटी रुपयांच्या दोन प्रमुख रस्ते विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या महत्वपूर्ण निधी मंजुरीमुळे संपूर्ण कुरुल गटातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या प्रश्नाला आता गती मिळणार आहे.
कुरुल जिल्हा परिषद गटाचे धडाडीचे व कर्तव्यदक्ष सदस्य, जकराया शुगर लिमिटेड (वटवटे) चे चेअरमन आदरणीय माननीय श्री. सचिनदादा बिराप्पा जाधव आणि पंचायत समिती सदस्या सौ. कोमलताई अंकुश आवताडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि विशेष प्रयत्नांना हे मोठे यश लाभले आहे. मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असलेल्या या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळेच हा भरीव निधी खेचून आणण्यात यश आले आहे.
मंजूर झालेली मुख्य कामे (एकूण निधी: १ कोटी रुपये):
खालील दोन मुख्य कामांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे:
विरवडे ते कुरुल रस्ता सुधारणा करणे, – निधी: ५० लाख रुपये. कोथाळे ते सोहाळे रस्ता सुधारणा करणे, – निधी: ५० लाख रुपये.
जया भाऊंनी पाळला शब्द!
सोलापूर जिल्ह्याचे कार्यसम्राट आणि अत्यंत कर्तव्यदक्ष पालकमंत्री माननीय श्री. जयकुमारजी गोरे साहेब (आदरणीय जया भाऊ) यांनी निवडणूक काळामध्ये कुरुल जिल्हा परिषद गटातील जनतेला शब्द दिला होता की, येथील विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. आपल्या शब्दाचे तंतोतंत पालन करत आदरणीय जया भाऊ यांनी या दोन्ही कामांसाठी एकूण १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. यामुळे ‘बोले तसे चाले’ या त्यांच्या कार्यपद्धतीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
जिल्हा परिषद गटामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री. जयकुमारजी गोरे साहेब तसेच आमचे नेते आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे कुरुल, विरवडे, कोथाळे व सोहाळे येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने अत्यंत मनापासून आभार मानण्यात आले आहेत.
मा.श्री.सचिनदादा बिराप्पा जाधव आणि सौ.कोमलताई अंकुश आवताडे यांच्या या विकासोन्मुख कामगिरीमुळे संपूर्ण तालुक्यातून व कुरुल गटातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
”भारतीय जनता पार्टीचे सरकार हे सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहिले आहे. आमचे लाडके पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे (जया भाऊ) आणि महायुती सरकार हे नेहमीच कुरुल जिल्हा परिषद गटाच्या हक्कासाठी आणि प्रगतीसाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहे. निवडणुकीत दिलेल्या शब्दाची पूर्तता करत सरकारने १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, येणाऱ्या काळातही या माध्यमातून कुरुल गटातील प्रत्येक गावाचा कायापालट करण्यासाठी आम्ही अविरतपणे कार्यरत राहू.” – सचिन जाधव ( सदस्य – जिल्हा परिषद सोलापूर)





